<
ठाणे दि. 3( जिमाका) कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. यामध्ये बरेच कामगार, विदयार्थी, पर्यटक व यात्रेकरू इतर व्यक्ति वेगवेगळया ठिकाणी अडकलेल्या असुन सध्या त्यांना मुळगावी जाण्यासाठी परवानगी देणेबाबत केंद्र व राज्य सरकार कडून प्रक्रिया विहीत करण्यात आली आहे.
ज्या व्यक्ती ठाणे जिल्हा हद्दीतुन महाराष्ट्रातील इतर जिल्हयांमध्ये किंवा इतर राज्यातील त्यांचे मुळगावी जावू इच्छितात अशा व्यक्तींच्या समुहाने आपल्या प्रवासाच्या साधनांची स्वत: सोय करून covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावून माहिती भरायची आहे. याबाबत ऑनलाईन पास परिमंडळ पोलीस उप आयुक्त/ संबंधित यंत्रणा यांचे कडून मंजुर केले जातील व प्रवाशांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. पास मंजुर झालेनंतर प्रवाश्यांचा गटप्रमुख यांचेबरोबर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपर्क करून त्यांना प्रवासासंदर्भात पुढील सुचना देतील.
ज्या व्यक्तींना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य होत नाही अशा प्रवाशांनी आपल्या गटप्रमुखांच्या माध्यमातून विहीत केलेल्या तक्त्यामध्ये माहिती भरून फक्त एक व्यक्ति आपल्या रहिवाशी पत्ता असलेल्या पोलीस स्टेशनला सदरची माहिती ‘ Migrant Passes Cell’ ला देतील व पोलीस निरीक्षक यांचेकडुन प्रवासाबाबत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करतील.
प्रवाशांनी नाव नोंदणी करण्यापुर्वी आपली इन्फ्युइंझा ची लक्षणे नसले बाबतची तपासणी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करून घेवून प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन अर्जदाराने अपलोड करावे व offline अर्जदार यांनी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष सादर करावे.
तसेच प्रवाशाचा सध्या राहत असलेला पत्ता हा containment Zone मध्ये असेल तर सदर व्यक्तीस containment Zone समाप्त होई पर्यंत पास देता येणार नाही.
सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोना प्रचार रोखणेसाठी जास्तीत जास्त व्यक्ती आंतरराज्य व राज्याअंतर्गत प्रवासासाठी covid19.mhpolice.in या संकेतस्थळाचा जास्तीत जास्त वापर करून प्रत्यक्ष पोलीस स्टेशन येथे जाण्याचे टाळावे.
अपवादात्मक स्थितीत पोलीस स्टेशनला फॉर्म जमा करणेसाठी जावे लागल्यास एकत्रितपणे किंवा गटाने न जाता गटाची यादी घेवून गटप्रमुखाने जावे व जागतीक महामारीचा प्रसार रोखणेस सहकार्य करावे.
स्थानिक नगरसेवक, राजकिय कार्यकर्ते, कंपनीचे व्यवस्थापक, कामगार संघटनेचे पदाधिकारी, एन.जी.ओ. यांनी आपआपले हद्दीतील कामगार व इतर अडकलेल्या व्यक्तिंना त्यांचे घरी जाणेस मदत व्हावी म्हणुन गटनिहाय नोंदणी प्रकियेत आपले स्थरावर सहकार्य करून प्रवाश्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा जास्तीत जास्त अवलंब करणेस प्रवृत्त करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून यांचे कडून करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी 022 25381886/022 25301740
022 25381886/022 25301740
या नंबरवर संपर्क करावा.