<
दिनांक:३ एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी
आज देशासह संपूर्ण जग कोरोना विषाणूसोबत निकराने लढा देत आहे. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. फक्त जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सर्वच गोष्टींची खरेदी विक्री करण्याबाबत शासनाने निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम मद्यप्रेमींवरसुद्धा झाला आहे. मद्यविक्रीस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने साथीचे रोग अधिनियम, १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शासनाचे परिपत्रक महसूल, वनविभाग, आपत्ती निवारण मदत आणि पुनर्वसन, दिनांक २५ मार्च २०२० अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापना ह्या दिनांक ३ मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आल्याने या कार्यालयाचे संक्रमांकीत दिनांक ३० एप्रिल २०२० रोजीचे ज्ञापनान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती दिनांक ३ मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहे.
परंतु लॉकडाउन दिनांक १७ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आलेला असल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती ह्या दिनांक २०२० पर्यंत बंद राहतील हि बाब ज्याने त्याने कार्यक्षेत्र अनुज्ञप्ती धारकांच्या निदर्शनास आनुंद द्यावी, नमूद तारखेपर्यंत अनुज्ञापत्य बंद राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी. सदर बाबतीचे उल्लंघन करून जे अनुज्ञप्ती धारक मद्यविक्री करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कारवाई करून अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा अशी माहिती राज्यउत्पादन शुल्क, मुंबई उपनगर विभागामार्फत प्रसारित करण्यात आली आहे.