<
कळंब, तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नसल्यामुळे जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील काही अटी शिथिल करीत बहुतांश उद्योग धंदे चालू झाले आहेत तसेच कापड दुकाने , सोने चांदी , शुज , मोबाईल, फोटोग्राफी दुकानासह जवळपास ८०% दुकाने चालू झाली आहेत.तसेच मद्यविक्रीची दुकाने मध्ये दोन व्यक्तितील अंतर ६ फूट राहील तसेच एकच वेळी आस्थापनेत ५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत अशी अट घालण्यात आली आहे. मास्क ,सैनीटायझर आणि गर्दी न करणे हे नियम कडक आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने २० मार्चपासून कुलूपबंद करण्यात आली होती. दोन लॉकडाऊन संपल्यानंतर आज ४ मे पासून तिसरा लॉकडाऊन सुरु झाला आहे. मात्र उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये असल्याने काही अटी आणि शर्ती घालून सर्व दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
असे असेल वेळापत्रक
– दूध, भाजीपाला केंद्रे, भाजीपाला फिरते विक्रेते, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच चालू ठेवण्यात येतील
- जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने, चष्माच्या दुकानाह २४ तास चालू राहतील.
- जिल्ह्यातील कृषी विषयक बी- बियाणे, खते, कृषी अवजारे, स्पेयर पार्टस सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील.
- इतर सर्व आस्थापना सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील.