<
जळगाव(प्रतिनिधी):- मा.जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव तसेच मा तहसीलदार साहेब जळगाव यांच्या आदेशानुसार जळगाव शहरातील रास्त भाव परवाना धारक रेशन दुकानावर मे जून २०२० महिन्याचे धान्य वाटप देखरेख कामी शिक्षकांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत.
यात स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थीस धान्य नियमानुसार धान्य वितरित करीत आहे किंवा नाही याची शिक्षकानी खात्री करावयाची आहे. नियमानुसार त्या कार्डधारकाला किती धान्य मिळणार व ते त्याला मिळाले किंवा नाही.त्या कार्डधारकांचे पूर्ण समाधान झाले किंवा नाही; त्याची काही तक्रार तर नाही ना या सर्व बाबींचे शिक्षकाने संपूर्ण खात्री करावयाची आहे.त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे.या जबाबदारीचे कर्त्यव्य पालन आज प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव व अविदीप पवार यांनी गणेश कॉलोनीतील स्वस्त धान्य दुकानावर केले.१ में पासून मुख्याध्यापक शोभा फेगडे शिक्षक संगीता गोहिल,सुवर्णा शिराळकर,नम्रता पवार ,संध्या अट्रावलकर,सारिका तडवी यानी आपली जबाबदारी पार पाडली आहे .यात त्यांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्याचे लाभार्तिना आवाहन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.हे करत असताना त्यांच्या टीमचे पर्यवेक्षक गुलाब मोहम्मद यांनी वारंवार भेट देऊन सुचाना दिल्या.
नागरिकांना सर्वानी सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्याचे आवाहन केले आणि आवश्यकता नसल्यास घरीच थांबून देशसेवेत सहभागी व्हा व स्वताची काळजी घ्या असा संदेश दिला.