<
चोपडा-(प्रतिनिधी) – येथील चोपडा तालुका लाडशाखीय वाणी समाज मंडळातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी, समाजातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या समाजबांधवांचा गौरव सोहळा राजेंद्र अमृतकर यांच्या निवासस्थानी दि. ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या गुणवंत गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मोरानकर (भारतीय वन सेवा) हे होते. श्री मोरानकर यांचे हस्ते कृषिकन्या कविता वाणी, प्रकाश चिंचोले, गुणवंत विद्यार्थी व नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ कल्पना कोठावदे यांनी तर प्रास्ताविक व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राजेंद्र अमृतकर यांनी केले. आभार प्रदर्शन सुनिल भदाणे यांनी केले.
नूतन कार्यकारिणी:-
सदर कार्यक्रमात समाजाची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष: सुनील भदाणे, उपाध्यक्ष: हेमंत वाणी, सचिव: सुनील दहीवेलकर, कार्याध्यक्ष: अनिल कोठावदे, कोषाध्यक्ष: प्रकाश चिंचोले, सहसचिव: आर.आर.येवले, सहकोषाध्यक्ष: गजानन पाटे, संघटक: अशोक वाणी, पंकज वाणी, प्रसिद्धी प्रमुख: संजय अमृतकर, संपर्क प्रमुख व मार्गदर्शक: राजेंद्र अमृतकर व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था गजानन पाटे व सतिष पाटे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक वाणी, प्रकाश चिंचोले, सुनील दहिवेलकर, सुनिल भदाने, अनिल कोठावदे, राजेंद्र अमृतकर, हेमंत वाणी, हेमंत वाणी(गलंगी), पंकज वाणी, विशाल पाटकर, सुनिल वाणी, सतिष पाटे, गजानन पाटे, प्रवीण वाणी, संजय अमृतकर, प्रमोद कोतकर, रवींद्र नाकवे, भरत अमृतकर व तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.