<
दिनांक: ४ मे २०२०, मुंबई प्रतिनिधी
आज भारतासह सर्व जगावर कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट ओढवले आहे. गेल्या महिनाभरापासून जास्त कालावधीपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यातच अनेक सरकारी यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अनेक सेवाभावी संस्था व समाजसेवक अतिशय निकराने कोरोनाविष्णुच्या लढ्यामध्ये सक्रियपणे सेवा प्रदान करत आहेत.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक खाजगी दवाखाने व हॉस्पिटल हे बंद असल्याने मतदारसंघातील नागरिकांची हेळसांड होत आहे. याच गोष्टीची दखल घेत भारतीय जैन संघटना, क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग यांच्या माध्यमातून व सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार, नगरसेवक श्री. रमेशभाई कोरगावकर यांच्या प्रयत्नाने भांडुप मध्ये मोफत मोबाईल दवाखाना चालू करण्यात आला आहे.
आज हे मोफत आरोग्यतपासणी शिबीर माता रमाबाई आंबेडकर नगर क्रमांक १, या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सादर शिबिरामध्ये विभागातील ३५० पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत औषधोपचार करण्यात आला.
प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका ११५ चे कार्यसम्राट नगरसेवक श्री. उमेशजी माने यांनी सुद्धा आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली व नागरिकांना कोरोना विषाणू बद्दल माहिती तसेच खबरदारीच्या सूचना दिल्या.
आमदार रमेश कोरगावकर यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये सर्वोतोपरी सेवा पुरविल्या जात आहेत. नागरिकांमध्ये या संकटसमयीसुद्धा कोणत्याच गोष्टीची अडचण निर्माण होणार नाही या साठी आ. कोरगावकर विशेष प्रयत्न करत आहेत.