<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या 18 मार्च, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने संपूर्ण राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. शिवाय शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची केवळ 5 टक्केच उपस्थिती असावी, असे शासनाचे आदेश आहेत.
नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार माहे मे महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. असे उपायुक्त, (महसूल) दिलीप स्वामी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.