<
जळगांव(प्रतिनीधी)- जगात व देशात महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ अर्थात कोरोना मुळे सर्वजण हतबल झाले आहे. अमेरिका – इटली- स्पेन इ राष्ट्र कोरोना शी लढा देत आहे. त्याच बरोबर आपले भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने देखील देशातील व राज्यातील नागरिकांना ह्या महामारी कोरोना पासून वाचवण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न करीत आहे. त्याच दृष्टीने भारत सरकारने २५मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन अर्थात ताळेबंद केले आहे.
त्यामुळे आपण कोरोना शी लढा देण्यात यशस्वी होत आहेत. महाराष्ट्र सरकारने तर २२ मार्च पासूनच ताळेबंद केले आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे एकदम कुशलतेने महाराष्ट्र वर आलेल्या संकटाला मात देत आहे. ह्या बाबतीत मा. उद्धवजी ठाकरे यांचे अभिनंदन केले पाहिजे. मा. उद्धवजी ठाकरेंनी नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना ज्या पद्धतीने आर्थिक सहाय्य केले आहे. महाराष्ट्र शासनाचे जसे बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे. तसेस मंडळ घरेलू कामगार महिलांचे देखील,जे २०११ साली स्थापन करण्यात आले आहे.त्यामाध्यमातून घरेलू कामगार महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. ज्या महिला इतरांच्या घरी जाऊन धुणी भांडी करण्याचे काम करतात. त्या कामावर त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ह्या महिला दीड महिना झाले घरी आहे. इतरांची घरची धुणी भांडी घासून जे घर खर्च भागायचा तो बंद झाला आहे. पुढे यांना हे घर मालक कामावर घेतील का याची शास्वती नाही. यांना दुसरं काम मिळेल का हे माहीत नाही, यांच्या मुलांचे शिक्षण, संगोपन, इतर खर्च यांच्या कडून भागणार आहे. माझी शासनाला विनंती आहे की, आपण नोंदणीकृत केलेल्या घरेलू कामगार महिलांना ७००० हजार रुपये आर्थिक सहाय्य करावे. जे करून त्यांना अडचणी चा सामना करावा लागणार नाही, असे समता सैनिक दल व रिपब्लिकन पार्टि आँफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी पत्रव्यवहाराद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.