<
दररोज ५०-५५ जण लाईनीत उभे राहुन परत जात असल्याची वस्तुस्थिती चर्चा आहे ? – कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांनी घ्यावी दखल
सुरू झालेले शिव’भोजन थाळी केंद्रात मिळतयं अतिशय उत्तम प्रकारचे स्वादिष्ट जेवण – आहेत जेवण घेणारे समाधानी !
जळगाव प्रतिनिधी : पाचोरा शहरात लाॅकडाऊन असल्याने व कोरोनासदृश्य परीस्थिती असल्याने शासनाने शिव भोजन थाळी केंद्र सुरू केले असुन त्यात दररोज ७५ शिव भोजन थाळींचे वितरण अन्नापासुन वंचीत गरीब लोकांना फक्त ५ रूपयात होत असते.
या शिव भोजन थाळी केंद्राचा उपभोग गरीब लोग घेत असुन अतिशय सुंदर असा उपक्रम कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेसाहेब यांनी पाचोरा शहरात सुरू केला आहे व ते स्वत: लक्ष ठेऊन राबवत आहे.
आज शहरात ज्यांना निवारा नाही असे लहान चिमुकल्यांना आता हे शिव भोजन थाळी केंद्र हे आधारस्तंभ बनले आहे.
या शिव भोजन थाळी’मधील जेवण हे अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असल्याने थाळी घेणारेंची गर्दी आता दररोज वाढत आहे.
अनेक लोकांना लाईनीत उन्हात उभे राहुन परत उपाशी जावे लागत आहे.असं मुळीचं होऊ नये व त्यांना न्याय मिळावा म्हणुन शिव भोजन थाळींची संख्या वाढवुन ७५ ऐवजी आता १५० करावी.जेणेकरून सर्वांना या शिव भोजन थाळी’चा आनंद घेता येईल.
मा.कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे साहेबांनी त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी लाईनीत उभे राहुन परत जाणारे लोकं आणि पाचोरा राजकारण ग्रुपतर्फे करण्यात आली आहे.