<
उस्मानाबाद, दि. 5 (जिमाका) :- शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांस अनुसरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्यविक्री दुकाने वगळून, जिल्ह्यातील इतर एफएल-2, सीएलएफएलटीओडी-3 अनुज्ञप्ती (वाईनशॉप), एफएलबीआर-2(बिअरशॉपी) व सीएल-3 अनुज्ञप्ती (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) दि. 4 मे 2020 पासून सुरु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
या आदेशात अंशत: बदल करुन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) च्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3) देशी, विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4 सीएलएफएलटीओडी-3), तसेच बिअर किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएलबीआर-2) आणि एफएल-1, सीएल-2 या अनुज्ञत्या दि. 6 मे, 2020 पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारीत करीत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची सर्व अनुप्तीधारकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आदेश दिले आहेत.