<
जळगाव, दि.५ – जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आणि कोरोनामुळे मृत्यू पावत असलेल्यांचा दर अधिक असल्याने माजी पालकमंत्री आ.गिरीश महाजन यांनी चिंता व्यक्त केली.
यापुढे एकही मृत्यू होणार नाही याकरता सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार गिरीश महाजन यांनी डायरेक्टर व अधिष्ठाता खैरे यांना केल्या यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन भास्कर खैरे डॉक्टर हनुमंतराव पोटे किरण पाटील अदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते आमदार गिरीश महाजन यांनी घेतला आढावा
मृत्यूदर कमी करण्यासाठी खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन आमदार गिरीश महाजन यांनी केले यावेळी गिरीश महाजन यांनी डायरेक्टर तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष देऊन काय उपाय योजना करण्यात येतील यावरही चर्चा करण्यात आली यावेळी करोणा रुग्णावर उपचार करत असताना त्यांना सर्व अत्यावश्यक फॅसिलिटी उपलब्ध करून देण्या संदर्भात अधिष्ठान डाँ.खैरे यांना सांगितले करोणा पॉझिटिव रुग्णावर उपचार करण्यासाठी पाच व्हेंटिलेटर ची व्यवस्था आमदार गिरीश महाजन यांनी करून दिली याबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे यांनी गिरीश महाजन यांचे धन्यवाद व्यक्त केले, यावेळी आ.राजुमामा उपस्थित होते.