<
मुंबई प्रतिनिधी
आज कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून लॉकडाउन उपकरण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच गोष्टींची खरेदी विक्री बंद आहे. त्यातच दारूची दुकाने सुद्धा बंद होती पण रविवारी केंद्र सरकारच्या आदेशानुसार वाईनशॉप उघडण्यास परवानगी देण्यात आली. पण सोमवार सकाळी वाईनशॉप चालू होताच मद्यप्रेमींनी एकाच गर्दी करण्यास सुरवात केली, ठिकठिकाणी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडविण्यात आला, मुंबईत सुद्धा बहुतांश भागांमध्ये हीच परिस्थिती उद्भवली. एकीकडे कोरोना रुग्णाच्या संख्ये मध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारच्या अशा निर्णयाने व तळीरामांच्या होत असणाऱ्या गर्दीने सामान्य नागरिक अतिशय त्रस्त व भयभीत झाले होते. म्हणूनच सर्वच स्तरांमधून या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठवण्यात आली.अखेर सर्व स्तरांमधून होणाऱ्या मागणीला मान देत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दारूची दुकाने पंगा एकदा बंद करण्याचे आदेश जरी केले आहेत. जीवनावश्यक वस्तू व औषधे वगळता कोणतेही दुकान उघडण्याची पत्रवानगी नसेल असे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबईत दारूच्या दुकानासमोर वाढत चाललेली गर्दी पाहून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिनाभरापासून वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन, सफाई कर्मचारी अनेक सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते हे लोकांना लॉकडाऊन कालावधीमध्ये सेवा देण्यामध्ये व्यस्त आहेत. अशात वाईनशॉप उघडणे या सारखा निर्णय झाल्याने सर्वाना आपण करत असलेल्या मेहनतीवर आता पाणी फेरले जाईल याच गोष्टीची खंत वाटत होती.
या आदेशाने सामान्य नागरिकांना दिलासा भेटला आहे. तसेच सर्वच स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.