<
विरोदा(किरण पाटील)- आंतरराष्ट्रीय श्रीकृष्णभावनामृत संघाचे संस्थापकाचार्य अभय चरणारविंद भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांचे प्रिय शिष्य महामंडलेश्वर प.पु. नवयोगेंद्र स्वामी महाराज यांच्या 74 व्या प्रकट दिनानिमित्त दि. 5 मे रोजी फैजपूर नगरीत हरे कृष्ण मंदिरातर्फे गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.
कोरोना वैश्विक महामारी मूळे लॉकडाउन च्या वर्तमान स्थितीमध्ये हजारो मजूर लोक आपल्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. संपूर्ण भारतातील इस्कॉनची मंदिरे अशा गरजू व्यक्तींना हैजनिक वातावरणात बनवलेले व उच्च गुणवत्ता असलेले अन्न प्रसादाच्या रूपात रोज वितरित करत आहेत. या उपक्रमाबद्दल इस्कॉनचे कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील केले आहे. याच इस्कॉन संस्थेची शाखा आपल्या फैजपूर नगरीत 18 वर्षांपासून कार्यरत आहे. वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम या मंदिरातर्फे राबवले जातात. कोरोना टाळन्यासाठी आवश्यक काळजी घ्या, गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा व शासनाच्या नियमांचे पालन करा अशी आग्रहाची विनंती मंदिराचे उपाध्यक्ष श्रीमान माधव प्रभू यांनी केली. या उपक्रमात नरेंद्र परदेशी, उमेश बारी, तेजस परदेशी, राकेश धांडे, चिराग बोरवले, मेहुल भावसार,जयेश सरोदे यांचे सहकार्य लाभले.