<
जळगाव, (जिमाका) दि. 6 – वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा व उजवा तसेच जलाशय उपसातून चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यानुसार उन्हाळी हंगामासाठी व बारमाही भाजीपाला, तेलबिया, कडधान्य व भुसारपिके इत्यादि पिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षणा व्यतिरिक्त उपलब्ध साठ्यातून पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अटींची पुर्तता करू शकणाऱ्या शेतकऱ्यांनी नमुना क्रमांक 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज 9 मे 2020 पर्यंत सादर करावेत. सदरचे अर्ज वाघुर धरण उपविभाग क्रमांक 1 व 2 वराडसिम वाघुर धरण उपविभाग क्रमांक 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्यात यावे.
आवर्तनातुन सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी अटी व शर्ती अशा आहेत. उन्हाळी हंगाम 2019-2020 अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजूरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी तसेच प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजूर क्षेत्रासच व मंजूर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तिका संबंधित उपविभागा दाखवावी लागेल. पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजूरी देण्यात येईल.
या अटी असून त्याचे पालन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे जास्तीतजास्त उत्पन्न काढावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.