<
विरोदा(किरण पाटील)- देशव्यापी लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्यातील दि.५ मे चा पहिल्याच दिवशी सोशल डिस्टिंगचे नियम धाब्यावर ठेवून वाईन शॉपच्या दुकानावर मद्य घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. वाईन शॉपला शासनाने परवानगी देताच शहरातील सुभाष चौक भागात वाईन शाप वर अलोट गर्दी झाली असल्याचे चित्र जनसामान्यांना दिसून आल्यामुळे अनेकांना आचार्याच्या धक्का बसला.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे फैजपुरात शुकशुकाट जाणवत होता. परंतु शासनाने वाईन शॉपला परवानगी देताच तळीरामांनी वाईन साठी अक्षरशः अलोट गर्दी करून लॉक डाऊनलोड तीन तेरा वाजून टाकले. यामुळे आता जनसामान्यांमध्ये कोरोना संसर्ग ला आळा बसेल की नाही? असा नागरिकांन मध्ये प्रश्न निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे जनसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांची ची सुद्धा याठिकाणी तारांबळ उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. वाईन शॉपच्या दुकानावर मद्य घेण्यासाठी लागलेल्या रागांमुळे कोरोना विषाणू संसर्ग चा धोका वाढणार नाही का? असा प्रश्न नगरवासीयांमध्ये उपस्थित झाला आहे