<
जळगांव- (चेतन निंबोळकर) -शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला तसेच सामाजिक संस्थांना या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्थांचा कल आहे. याच अनुषंगाने शहरातील शिवकाँलनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनच्या वतीने भारतीय प्रजातीचे कडूनिंब, चिंच, आंबा तसेच छायादार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रत्येक मुलाला वर्षभरासाठी एक रोप दत्तक देऊन, त्या रोपाचे योग्य ते संवर्धन केल्यास त्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाईल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिले.या विद्यार्थ्यांना दिली दत्तक झाडे:- पुनम पाटील, चेतना पवार, ऐश्वर्या बारी, जय भावसार, कौसर शेख, चेतन सपकाळे, दर्शन राठोड, भाविका सोनगडा, दर्शन चौधरी, नम्रता बारी यावेळी, शाळेचे चेअरमन तथा ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील सर, संस्था अध्यक्ष फिरोज शेख, प्रा. मनोज भालेराव, चेतन निंबोळकर, मुख्याध्यापिका सौ.वसाणे मॅडम, सौ. भारंबे मॅडम, सौ. ब्राम्हणकर,सौ.सविता ठाकरे, सुदर्शन पाटील, रवी शिंदे, शरद बिऱ्हाडे, सुवर्णा अडकमोल आदी उपस्थित होते.