Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धोकादायक गर्भनिरोधके

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in लैंगिक शिक्षण
Reading Time: 1 min read
धोकादायक गर्भनिरोधके

गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करताना त्यांचा फायदा काय आणि त्यांचे धोके काय या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या गरभनिरोधक पद्धती मासिक पाळीच्या चक्रामध्ये किंवा स्त्री बीज तयार होणं आणि अंडोत्सर्जन या प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात तसंच ज्या पद्धती किंवा साधनांवर आपलं नियंत्रण नाही त्या पद्धती किंवा साधनांना धोकादायक गर्भनिरोधकं म्हटलं जातं. यांचा वापर करण्याआधी या पद्धतींचे संपूर्ण शरीरावर होणारे परिणाम जाणून घेणं गरजेचं आहे.

संप्रेरक इंजेक्शन 

नेट एन किंवा डेपो प्रोवेरा नावानं बाजारात आलेलं हे इंजेक्शन संप्रेरकाचा वापर करते. इंजेक्शनचा प्रभाव 3 महिने राहतो. संप्रेरकामुळे स्त्री बीजाची वाढ रोखली जाते, अंडोत्सर्जन होत नाही ज्यामुळे गर्भधारणा होत नाही. संप्रेरकाच्या प्रभावामुळे गर्भाशयाचं अस्तर वाढत नाही आणि त्यामुळे गर्भ रुजू शकत नाही.

या पद्धतीचे संपूर्ण शरीरावर परिणाम होतात. मासिक पाळी अनियमित होणे, हाडं ठिसूळ होण्याची आणि स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढणे हे या पद्धतीचे सर्वात मोठे धोके आहे.

संप्रेरकयुक्त इंप्लांट 

नॉरप्लांट या नावाने बाजारात आलेलं हे गर्भनिरोधक म्हणजे त्वचेखाली बसवण्याचं एक साधन आहे. सिलिकॉनच्या 6 (आता 2) पातळ पट्ट्यांमध्ये लेवोनॉरजेस्टेरॉल हे संप्रेरक असतं जे त्वचेतून पूर्ण शरीरात पाझरतं. हे गर्भनिरोधक पाच वर्षं प्रभाव करतं. स्त्री बीजाची वाढ थांबंवणं, अंडोत्स्र्जन थांबवणं आणि गर्भाशय व योनिमार्गातील स्राव घट्ट करणं जेणे करून पुरुषबीजं जिवंत राहू शकणार नाहीत अशा रीतीने नॉरप्लांट काम करतं.

या गर्माभनिरोधकाच्या वापरामुळे पाळीमध्ये बिघाड, डोकेदुखी, नैराश्य, चिंता, वजन वाढणे, चक्कर येणे असे अनेक दुष्परिणाम पाहण्यात आले आहेत.

संप्रेरक इंजेक्शन तसंच इंप्लांट या दोनही प्रकारच्या गर्भनिरोधकांवर वापरणाऱ्या स्त्रीचं नियंत्रण नसतं आणि एकदा वापर सुरू केल्यावर ती सहजासहजी थांवता येत नाहीत. त्यामुळे या दोन्ही गर्भनिरोधकांना स्त्री संघटना आणि आरोग्य चळवळीनेही विरोध केला आहे.

अधिक माहितीसाठी :-  ‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वृक्ष लागवडीसह संवर्धन गरजेचे- फिरोज शेख

Next Post

पर्यटकांना खुणावतोय मनूदेवी धबधबा

Next Post

पर्यटकांना खुणावतोय मनूदेवी धबधबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d