<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. ७- जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या ३१ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी २७ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दिनांक ६ रोजी पॉसिटीव्ह असलेल्या अमळनेर येथील ३६ वर्षीय कोरोना बाधित महिला रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.