<
कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कोरोनाच्या अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कळंब तालुका मनसे सचिव गोपाळ घोगरे,कळंब तालुका उपाध्यक्ष महेश भोरे,मनसे सर्कल प्रमुख गणेश घोगरे यांनी समस्थ शेतकरी,दूध उत्पादक यांच्या वतीने कृषिमंत्री, जिल्हाधिकारी,आमदार,तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.कोरोना व्हायरसमुळे शेतीमालाला बाजरभाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी अन् आता कोरोनामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.तसेच मोठ्या प्रमाणात दुधाचे दर कमी करून संकलन केले आहे. असेही या निवेदनात नमूद केले आहे. तसेच शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर देवून दूध संकलन करावे आणि अशातच पेरणीपूर्व मशागतीची कामे तसेच पेरणीसाठीचा खर्च ही होणार आहे, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. यामुळे शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई आणि शेतमालाला योग्य तो हमीभाव द्यावा असे कळंब तालुका मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.