<
जामनेर,दि-७ प्रतिनिधी:–अभिमान झाल्टे
देशात “कोरोना”या महामारी आजाराची झपाटयाने वाढ होत असतांना शासन नागरीकांना घरात बसवून त्यावर उपाय योजना करीत आहे .
तर एकीकडे जामनेर तालुक्यातील काही संस्था , संघटना, राजकीय पक्ष गरजवंत नागरीकांना अन्न, धान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन त्यांना उपासमारी पासुन वाचवतांना दिसत आहे .
कारण त्यांना आज रोजगार उपलब्ध नाही . तर दुसरीकडे तालुक्यातील शिंगाईत परीसरात गावठी दारूचा यथेच्छ बाजार मांडला जात आहे ग्रामीण भागेमध्ये गावठी दारुचा पुरवठा होतोच कसा हा प्रश्न निर्माण होत आहे .
तालुक्यातील शिंगाईत शिवारातील भुसावल रोड लगत, शेताच्या आवारमध्ये हि अवैध गावठी दारूची भट्टी सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी दि .६.५.२०२० रोजी रात्री १० वाजता छापा टाकला असता . विजय बंडु मोरे रा.खडकी व सचिन संतोष बोरसे रा .जामनेर पुरा यांच्या कडुन १५० लिटर उकळते रसायन, एकुण २२००० रुपये किंमतीचा मुद्देमाल तयार दारु व दारू बनविण्याच्या साहित्यासह अटक करण्यात येवुन . सदर दारू व रसायन जागेवर नष्ट करण्यात आल्याची माहिती जामनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली .
या प्रकरणी अटक आरोपींविरूदध प्रमोद अरुण लाडवंजारी यांच्या फिर्यादी वरुन भा .द.वी. कलम ३२८ / १८८ / २७० .आपत्ती व्यवस्था अधिनियम २००५ . ५१ ( ब )साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम २ .३ .४ . महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ( फ) ( ब ) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकांमध्ये , पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लोहारे, राजेंद्र पाटील, अनिल माळी, रमेश चौधरी, राजेश मेढे, संजय हिवरकर, सुधाकर मोरे, संतोष मायकल, राजेंद्र पवार, किरण धनगर यांनी उत्तम कामगीरी केली . या प्रकरणी पुढील तपास जामनेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे !