<
जळगांव(प्रतिनीधी)- कोरोना व्हायरसपासून स्व-सुरक्षेसाठी कृती फाउंडेशन तर्फे शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना ज्ञानेश्वर(छोटू) महाजन, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमीत माळी, डाँ. श्रेयस महाजन, बंटी चौधरी यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. आतापर्यंत कोरोनाचे जगात सहा हजारहून अधिक बळी गेलेले असतानाच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच देशांत प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा शिरकाव भारतात तसंच महाराष्ट्रात देखील झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
जळगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढ होत आहे. जळगावात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ९० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगावातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावरची वर्दळ लक्षात घेता कृती फाऊंडेशनच्या वतीने शहरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत मास्क वाटप करण्यात आले. प्रसंगी समीर सैय्यद, बिलाल मलिक, अय्युब शहा, महेंद्र राजपूत, अमीर सैय्यद, शेखर सोनवणे, कल्पना राणा, संगिता बडगुजर, मालती राठोड, दिनेश पाटिल, विकार सैय्यद, फिरोज पठाण आदी पेट्रोल पंपावरील कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी पंप चालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांनी कृती फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.