<
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्याची टाकीत येथे मेलेले पक्षी आढळून आले. त्यात मेलेल्या पक्षांचे पिसे व कुजलेल्या पक्ष्यांच्या मासाचे तुकडे नळातून पाणी भरताना निघत होते. तर पाण्यातून मोठी दुर्गंधी येत होती. गावकऱ्यांनी गावातील सरपंचाना फोन केला असता सरपंच आहे फोन उचलत नव्हते. सदरील समस्या हि गेल्या दोन दिवसापासून सतत चालू होती. तरी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सरपंच व ग्रामसेवक करीत असून गावकऱ्यांच्या मनात मोठा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन गावकर्यांची कोणतीही दखल घेत नसून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.