<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
इंदिरा नगर वसाहतीत कोरोनारुग्ण अधिक असुनही व तो परिसर सील केला असूनही पश्चिमेकडील नागरिक बिनधिक्कटपणे तेथील गल्लीतून रेलवे ट्रकमध्ये रेलवेच्या हद्दीत असलेल्या कचऱ्याच्या मोठा ढिगारावर चढ-उतार करुन ट्रॅक पार करत ये-जा करत आहेत. त्यामुळे रेलवेने हा कचऱ्याचा ढिगारा ताबडतोब हटवावा तसेच येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना अटकाव करावा जेणेकरून मुलुंड पूर्वतील नानेपाडा व इतर परिसरात कोरोणाची बाधा होणार नाही अश्या आशयाचे एक पत्र नानेपाडा मित्र मंडळातर्फे मुलुंड रेलवे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असून इंदिरानगर येथून पूर्वेस येण्यासाठी असलेली वाट तात्पुरती बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील रेलवे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या इंदिरा नगर स्लम वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने मुलुंड पूर्वच्या नागरिकांना कोणताही संसर्ग होवू नये यासाठी पश्चिमेतून पूर्वेला येणारे सर्व रस्ते पूर्वेकडील नागरिकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फूर्तीने बंद केलेले आहेत फ़क्त रेलवे माल गोदामातून एक छोटा दरवाजा रेलवेने उघडा ठेवला आहे. याच दरवाजातून रेलवे ट्रॅक पार करत नागरिक पलिकडे ये-जा करताना दिसत आहेत त्यामुळे मुलुंड पूर्वला कमी असलेले कोरोनाचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.