<
विरोदा(किरण पाटिल)- जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गोर गरीब, हातमजुरी करणारे हताश होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या जनधन खाते धारकांना प्रत्येकी ५०० रु. खाते धारकांच्या खात्यात वर्ग केलेले आहे. मात्र, येथील स्टेट बँक इंडिया शाखेत गेल्या अनेक दिवसापासून बँकेत मनमानी कारभार सुरु असून येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला जनता कंटाळली असून वरिष्ठांनी दखल घेऊन ठोस पावले उचललावे अशी मागणी शहरातून होत आहे. संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत. मात्र, खात्यात वर्ग झालेल्या ५०० रु. काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
व बँकेतील कर्मचारी ग्राहकांना वेढीस धरत आहे. बँकेचे कामकाज कासव गतीने व त्यांच्या मनाप्रमाणे चालते. दररोज या बँकेत विड्रॉल असो अथवा पैसे भरायचे असो रांगेत तासनतास ग्राहकांना उभे राहावे लागते. त्यातच पुर्ण ग्राहक न करता मधातच जेवणाची सुट्टी म्हणून सर्व कर्मचारी आतमधल्या थंड हवेच्या रुममध्ये जातात. तासभर निघतच नाही तोपर्यंत ग्राहक कंटाळून बाहेर जातात. येथे नेमणुकीस असलेला सुरक्षा गार्ड यांच्याकडून बँकेत विविध कामासाठी येणाऱ्या ग्राहकांना खातेदारांना सर्रास हे गार्ड हाकलून देण्याचं काम करीत असून त्यामुळे खातेदार मध्ये संताप व्यक्त केला जात असून अशा वागणुकीमुळे व गलथान कारभारामुळे या बँकेचे अनेक खाते बंद होत असून अनेक खातेदार युनियन बँकेकडे वळत आहे. कर्मचारी मात्र दुपारी अडीच – तीन वाजताच गेटचे कुलूप लावून घेतात. तोपर्यंत बाहेरचा येणारा ग्राहक तळपत्या उन्हात जनावरांच्या कोंडवाड्यासमोर उभा राहील्यासारखा गेटवर उभा राहतो. मात्र बँकेचे कर्मचारी गेट उघडत नाही. ४५ डि.ग्री. सेल्सीयस पर्यंत उन्हाळा तापत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातुन आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी व आर्थीक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र, या बँकेचे कर्मचारी, अधिकारी आम्ही जनतेवर उपकारच करीत असल्याचा आव आणतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानीमुळे ग्राहकात चिड निर्माण होत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ठोस पावले उचललावे अशी मागणी शहरातून होत आहे.