<
जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्ण आढळलेल्या क्षेत्रात 17 मे पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता लाॅकडाऊन पाळण्यात यावा याबाबत चे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले.
जळगाव शहर महानगर पालिका, अमळनेर नगरपालिका, चोपडा नगरपालिका, पाचोरा नगरपालिका भुसावळ नगरपालिका या क्षेत्रात यापुढे जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता लॉकडाऊन राहणार आहे. या काळात अन्न औषधे व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना व पेट्रोल पम्प सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार आहे. नगर परिषद व महानगर पालिका क्षेत्रातील पेट्रोल पम्प साठी ही वेळ निर्धारित केली असून राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. तसेच एमआयडीसी प्राधिकरणाने सूट देण्यात आलेल्या औद्योगिक संस्थांना यातून वगळण्यात आले आहे.