<
दिनांक, ९ मे २०२०, नवीमुंबई प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा राज्यात तसेच देशात झपाट्याने होत आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणी ठाणे विभागामध्ये सुद्धा कोरोना रुग्णाची संख्या हि झपाट्याने वाढत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत दिनांक ८ मे २०२० रोजीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
आज एकूण ३३६ रुग्णाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 271 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 65 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.महानगरपालिका हद्दीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५९२ एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह संख्या:
बेलापूर-०१
नेरुळ-१५
वाशी-०९
तुर्भे-२१
कोपरखैरणे-०८
घणसोली-०५
ऐरोली-०५
दिघा-०१
आज ४ कोरोना पॉझिटिव्ह वाटी निगेटिव्ह होऊन बऱ्या झाल्या आहेत व घरी परतले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झालेल्या व्यक्तींची संख्या ७५आहे.
विभागनिहाय बरे झालेले रुग्ण,
बेलापूर- ३
नेरुळ- १
जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती शेअर करा व कॉर्न विषाणूच्या बाबतीत जनजागृती करा.
घरीच राहा, काळजी घ्या.