<
मुंबई-(प्रतिनिधी)- उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल अधिकृत घोषणेद्वारे मासु ने दिलेल्या (मागील सत्राच्या सरासरी गुणांचे आधारे याही सत्रात द्यावे) या प्रस्तावाची राज्यपाल नियुक्त समिती कडुन दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) कडुन सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आल आहेत.
मासु उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य समितीचे प्रमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर तसेच राज्य समिती सदस्य कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर आणि SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती.शशिकला वंजारी या सर्वांचे शतशः धन्यवाद आणि मनापासून आभार व्यक्त करतो.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अधिक खबरदारी घेणे अति आवश्यक असल्याकारणाने अशा परिस्थितीत वार्षिक परीक्षा किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण केलेल्या सर्व सेमेस्टरच्या गुणांची सरासरी विचारात घ्यावी आणि जेथे सरासरी गुण/ क्रेडिट गुण / ग्रेडच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अगोदरच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करून त्यांची सरासरी करून वार्षिक परीक्षा किंवा पुढच्या सेमिस्टरसाठी गुण प्रदान करण्यात यावेत जे यूजीसी मार्गदर्शक सूचनेला अनुसरून आहेत.
अशी आग्रहाची मागणी आम्ही प्रस्तावाद्वारे राज्य समितीकडे केली होती आणि राज्य् समिती व उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांना विद्यार्थी हित नजरे समोर ठेवून निर्णय घेतल्या बदल मी या निर्णयाचा माझ्या संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि राज्य समिती सदस्य व उच्च तंत्र शिक्षणंत्री यांच मी आभारी आहेत असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष अरुण कवरसिंग चव्हाण यांनी माहिती दिली. मासूची विद्यार्थी हितासाठीची भूमिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमांचे योगदान सुद्धा वाख्याण्याजोगे आहे आणि ते नाकारता येत नाही त्यासाठी मासु नेहमीच प्रसारमाध्यमांची ऋणी राहील.
रोहन युवराज महाजन (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन जिल्हाअध्यक्ष) यांनी सांगितलेराज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, आम्ही मासुने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या शासनापर्यंत पोहचवल्या आणि राज्य शासनाने जी समिती नेमली होती त्या समितीने हा निर्णय सर्वांगाने विचार करूनच घेतला असेल, नक्कीच यात कुलगुरू समितीने एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही त्या अनुषंगाने दूरदृष्टी ठेवून हा निर्णय घेण्यात घेतला असेल, आपल्या काही सूचना असतील, तक्रार,प्रश्न, शिफारशी असतील आम्हाला कळवा आम्ही नक्कीच त्या शासना पर्यत पोहचवू.
भविष्यात विद्यार्थी हितासाठी निर्णय घेण्यासाठी नक्कीच पाठपुरावा करू, मासुचे जळगाव विभागप्रमुख ऍड. अभिजित जितेंद्र रंधे हे यावेळी म्हणाले. आपल्या प्रतिसादाने खरोखरच विद्यापीठ राज्य समितीला आगामी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांसाठी एक सशक्त आणि विद्यार्थी केंद्रित योजना तयार करण्यास भाग पाडले याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी राज्य शिक्षण मंत्रालयावर झाला हे यातून निष्पन्न झाले आहे.