वरणगावं-(प्रतिनिधी):- वरणगाव येथे एका पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर या तिघांव्यक्तिरिक्त एक संशयीत अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती आहे. शहरातील तपत कठोरा रोडवर तरुणाचा घोळका रस्त्यावर बसलेला असताना एका पोलिसांनी त्यांना हटकले असता चार ते पाच तरुणानी गाडीला लाथ मारुण पोलिसाला काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. संचारबंदी असल्याकारणाने गर्दी पांगविण्याची जबाबदारी वरणगाव पोलिस बजावीत असताना शहरातीत तपतकठोरा रोडवर गस्तीवर असलेले एक कर्मचारी तरुणांचा घोळका दिसल्याने जमाव पांगवण्याच्या उद्देशाने तरूणांना गर्दी का करता? आपापल्या घरी जा? असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला व त्यांनी पोलिसांच्या गाडीला लाथ मारुण त्यांच्याच गाडीला खाली पाडून त्यांच्याच काठीने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरेप आहे. या घटनेत. पोलिस कर्मचार्यावर हल्ला झालाने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले तर पोलिस कर्मचार्याच्या डोक्याला तब्बल नऊ टाके पडले. दरम्यान, या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यातील एक अल्पवयीन असल्याचे समजते तर तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
तिघांना अटक : एकाला समज देवून सोडले सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम व सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका 17 वर्षीय आरोपीस ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास समज देवून सोडण्यात आले आहे. बाकी आरोपीना अटक करण्यात आले असून, याप्रकरणी वरणगावं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.