फैजपूर(किरण पाटील)- संपुर्ण जगात कोरोना विषाणूचा ( कोविड-१९) या महामारीने थैमान घातलेले आहे व याचा जास्त परिणाम महाराष्टराज्यात सुरू आहे. शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी शासनास आर्थिक सहायता निधी म्हणुन फुल न फुलाची पाकळी रक्कम रु.११ हजार चा धनादेश फैजपूर म्युनिसिपल कामगार सहकारी सोसायटी लि.फैजपूर यांचे वतीने मुख्याधिकारी किशोर चव्हाण, संस्था चेअरमन सुहास नेहेते, कामगार युनियन अध्यक्ष विलास सपकाळे, अध्यक्ष अविनाश चौधरी, कार्यालय निरीक्षक दिलीप वाघमारे, नरेंद्र बाविस्कर, टी.एन.चौधरी व सर्व न.पा. कर्मचारी यांचे उपस्थितीत सोशल डिस्टिंगचे पालन करून उपविभागीय अधिकारी फैजपूर डॉ.अजित थोरबोले यांचेकडे सुपूर्द करण्यांत आला आहे.