जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मिशन करुणा अंतर्गत आभार पत्र देत कौतुक करण्यात आले.
त्यांनी कोरोना या जागतिक महामारीच्या काळात फाऊंडेशनच्या माध्यमातून हातावर पोट असणाऱ्या गरजू, निराधार यांना महिनाभराचा किराणा किट तसेच पोलीस बांधव व नागरिकांना मास्क वाटप, तसेच नागरिकाचे समुपदेशन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचा मोठा वाटा उचलला आहे. त्यांच्या याच समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम तामिळनाडू यांचे सचिव मिलिंद चौधरी व महाराष्ट्र विभाग सचिव मनीषा चौधरी यांच्यावतीने आभार पत्र देत कौतुक करण्यात आले. त्यांनी यापूर्वी देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवत त्यांनी केलेले उत्कृष्ट समाजकार्य व जनसेवेची दखल घेत त्यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे.