जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
शहरातील डोहरी तांडा गावात श्याम चैतन्य महाराजांच्या गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीने एक घास प्रेमाचा चालविलेल्या अभियानांर्गत गावातील गरजू बांधवानाअन्नधान्यचे वाटप करून. शामचैतन्य महाराराजांनी कोरोना सारख्या भयंकर विषाणु सोबत आपन कसे लढायचे हे देखील समजवुन सांगीतले.
त्याच बरोबर आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आपले सर्व शासकिय अधीकारी जे नियम सांगताय त्याचे तंतोतंत पालन करन्याचे देखील आव्हान केले.
इतर देशांच्या तुलनेत आपले पंतप्रधान मुख्यमंत्री शासकीय अधिकारी आणि आपल्या देशाची संपुर्ण जनता कोरोणा महामारी विषाणुचा मुकाबला यशस्वीरित्या करीत आहे.
शासनाने दिलेल्या नियमांचे पुर्णपने पालन करुन या कोरोना विषाणुला देशातुन लवकरात लवकर हद्दपार करु असे मत देखील व्यक्त केले.
या एकघास प्रेमाच्या कार्यक्रमांमध्ये चैनसिंग तन्वर , रसाल तन्वर, गोकुळ चव्हाण, प्रकाश तन्वर, भाईदास चव्हाण , अक्षय राजनकर, भरत तन्वर जगदीश तन्वर.. व गावकरी उपस्थित होते.