इंदापूर (दि. १० मे २०२० जि. पुणे ) तालुक्यातील अशोकनगर येथे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉक डाऊन आणि काही भाग सील केल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या कामामध्ये अडचण येत असल्याने अशोकनगर परिसरातील जवळपास ५०० कुटुंबीयांना फिजिकल डिस्टंस, मास्क व स्वच्छते बाबतचे सर्व निकष पूर्ण करून अतिशय शिस्तबद्ध पणे किराणा किट चे वाटप करण्यात आले या वाटप उपक्रमाचा प्रारंभ मा. आमदार दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते गरीब कुटुंबातील महिलांना किराणा किट वाटप करून करण्यात आला.या साहित्यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर, चहा, मसाला, तिखट, हळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ( प्रत्येकी ५०० रू किमतीचे किट)यशवंत पाटील मित्र परिवार आणि अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर यांनी स्व खर्चातून किराणा साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या युवकांचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.
यावेळी श्री. भरणे यांनी सर्वांनी घरीच रहा, प्रशासनाला सहकार्य करा, आपले हात स्वच्छ साबणाने धुवा, मास्क चा नियमित वापर करा, हस्तांदोलन टाळा, फिजीकल डिस्टंस ठेवा, सॅनिटायझर चा वापर करा. तसेच सर्दी,ताप,खोकला, श्वास घेण्यास अडचण यांसारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या डॉक्टर ना भेटा असे सांगितले.सर्वांनी घरीच राहून सुरक्षितपणे आपल्या परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना या लॉक डाऊन च्या काळात शक्य तेवढी करण्याचे आवाहन मा. प्रदीप गारटकर यांनी केले.समाजाकरीता आपण काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष भावनेतून किराणा साहित्याचे वाटप करताना गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद हा आत्मिक समाधान देणारा असल्याची भावना यशवंत पाटील यांनी व्यक्त केली.कलम १४४ चा भंग न करता प्रत्येक व्यक्तीमध्ये फीजिकल डिस्टंस ठेवून कुठलीही गर्दी न करता लाभार्थींना मदत करण्यात आली. नागरिकांनीही सहकार्य करत किराणा किट घेतले. साधारण १०-१५ दिवस पुरेल इतका किराणा साहित्य सदरील किट मध्ये देण्यात आले आहे.प्रा. श्री. खवळे सर यांनी युवकांचे अभिनंदन करून या उपक्रमाचे कौतुक केले आणि आभार मानले.यावेळी यशवंत पाटील, अमोल पाटील, रणजीत निंबाळकर, बाबाराजे निंबाळकर, सागर भोईटे, प्रदीप पाटील, अजय गायकवाड, विठ्ठल ननवरे, महेश मोरे, चंद्रकांत सावंत, गौतम ननवरे, महम्मद शेख, प्रतीक ढाकणे, यशवंत पाटील मित्र परिवार आणि अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर चे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.