जळगाव-(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसात शहरातील ज्या भागात कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर महानगर पालिकेने कोरोना संसर्ग अधीक वाढू नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून या भागात प्रवेश व निर्गमनास बंदी घालण्यात आली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ज्या परिसरात कोरोना संसर्ग रुग्ण आढळून येतो तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते.
घाबरून जावू नये
नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाऊन व प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.