जळगांव(प्रतिनिधी)- जेसीआय चे झोन वाईस प्रेसिडेंट तसेच रोटरी जळगाव स्टार्स ला पब्लिक कमिटी चेअरमन जिनल जैन यांचे डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मिशन करुणा अंतर्गत आभार पत्र देत कौतुक करण्यात आले. त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जागतिक महामारीच्या काळात संस्थेच्या माध्यमातून हातावर पोट असणाऱ्या गरजू, निराधार यांना अन्न धान्य वाटप, आगग्रस्ताना मदत तसेच किराणा किट तसेच पत्रकार बांधव, बस स्थानक कर्मचारी व नागरिकांना मास्क वाटप, तसेच नागरिकाचे समुपदेशन करत सहकार्य करण्याचा मोठा वाटा उचलला आहे.
त्यांच्या याच समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम तामिळनाडू यांचे सचिव मिलिंद चौधरी व महाराष्ट्र विभाग सचिव मनीषा चौधरी यांच्यावतीने आभार पत्र देत कौतुक करण्यात आले. त्यांनी यापूर्वी देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवत त्यांनी केलेले उत्कृष्ट समाजकार्य व जनसेवेची दखल घेत त्यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे.
I appreciate congratulations.but sir what’s the matter in Jalgaon water is not supplying regularly I have experience of seven years every 15 days 2/2 3/3 days water not supplying.giving all bullsheet reason people will die without water before korona.altough it rained up to diwali