जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य गरजू लोकांची उपासमार होऊ नये, या मुख्य उद्देशाने जळगांव शहरासह जिल्ह्यात महिनाभरापासून कृती फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूसह मिठाई वाटप करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले.
संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली, रोजगार थांबला, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकुणच हातावर पोट असणाऱ्या आणि आणि गरीब-गरजू लोकांवर याचा पर्यायाने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे ! त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने कृती फाऊंडेशन आज “मदर्स डे”च्या निमित्ताने आईरूपाने पहाडासारखी उभी राहून शहरातील मजूर महिला, परितक्त्या, विधवा, एकाकी जीवन जगणाऱ्या निराधार वृद्ध महिलांना फाऊंडेशनच्या वतीने किराणा किट व मिठाई वाटप करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या काळात अशा अनेक माता कर्तव्यपरायणतेने मोल मजुरी करून आपला चरितार्थ चालवित आहेत. अशा रणरागिणी मातांच्या सन्मानार्थ “कृती फाऊंडेशन” त्यांच्या त्यागाचं कौतुक करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मागे उभी राहिली. असे उद्गगार यावेळी डॉ. श्रद्धा माळी यांनी काढले. सदर उपक्रम कृती फाऊंडेशन महिला आघाडी प्रमुख डॉ. श्रद्धा माळी व सरिता महाजन यांच्या संकल्पनेतून तर जागृती महाजन यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. प्रसंगी रंजना महाजन, संपदा माळी, स्मिता देवरे, भाग्यश्री महाजन, निवेदिता ताठे, अर्चना मोहिते, सीमा अपस्तंब आदी उपस्थित होते.