जळगाव :- देशात कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती झपाट्याने वाढत असतांना त्याविरोधातील लढाईसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. “रेडक्राँस” तर्फे फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम गेल्या एक महिन्यापासून जळगावच्या विविध क्षेत्रात राबवित आहे.
त्याचाच एक भाग आज जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांची रेडक्राँसच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून प्रत्येकाचे शरीराचे तापमान- हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण (Oxygen Saturation) तपासणी व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
एकूण १६२ कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषधे देण्यात आली. या तपासणी अंतर्गत कोरोना पार्श्वभूमीवर संसर्गाचा पूर्व इतिहास,त्याची शक्यता अत्यंत धोकादायक व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असतांना घ्यावयाची काळजी, पथ्ये इ.बाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
आजपर्यंत रेडक्रॉस च्या फिरत्या दवाखानच्या उपक्रमात ५२३२ नागरिकांची मोफत तापसणी त्यांना मोफत औषधपचारही करण्यात आला आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपली प्राथमिक आरोग्य तापसणी करून घ्यावी असे आवाहन रेडक्राँसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसान्नकुमार रेदासनी, युथ/जुनियर रेडक्रॉस चेअरमन श्री. राजेश यावलकर, आपत्कालीन व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष साखला, डीडीआरसी चेअरमन जे. टी. महाजन यांनी केले आहे. या उपक्रमात रेडक्रॉस तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरळकर तसेच रेडक्रॉसचे कर्मचारी व स्वयंसेवक कामकाज पाहत आहेत.