आनंद गार्डन नगरदेवळा स्टेशन येथे अवैध्यं रित्या बिअर विक्री भडगांव महसुल प्रशासनासह पोलिसानचा छापा
भडगाव/ पाचोरा- प्रमोद सोनवणे
सध्या देशासह राज्यात कोरोना या अति संसर्गजन्यं विषाणूचा पार्दूभाव वाढल्याने या विषाणू चा संसर्ग झालेले रुग्ण देशात ठिकठिकाणी आढळत आहे. कोरोना या विषाणूचा पार्दुभाव तथा संसर्ग रोखणे करीता शासनाच्या आदेशाने जळगांव जिल्हयात मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगांव यांच्या आदेशा अन्वये जिल्ह्यातील फक्त वाईन शॉपसाठी परवानगी दिली आहे. जळगांव जिल्हयात देशी विदेशी मद्दयाचे बियरबार दुकाने बंद करण्यात आले आहे. असे असतांना भडगांव तालुक्यातील नगरदेवळा स्टेशन येथील भडगांव-कजगांव रस्त्यालगत असलेल्या हॉटेल आनंद गार्डन येथे दुकानाचे हाफ सेटर उघडुन पाठिमागच्या साईडने अवैधरित्या विदेशी दारू विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती भडगांव तहसिलदारांना मिळाली त्या नुसार भडगांव तहसिलदार माधुरी आंधळे, तलाठी राहुल पवार, तलाठी एस.ए. मांडोळे परि.पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांच्यासह लक्ष्मण पाटिल, ईश्वर पाटील, स्वप्नींल चव्हाण, नितिन सोनवणे, होमगार्ड भरत चव्हाण या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी दि. १०. मे रोजी रात्री ९:३० वाजता.छापा टाकुन २३,७६० किमंतीची किंगफिशर बियर ६५० मिली मापाचे,१२ बॉक्स त्यात प्रत्येकी १२ नग,३१३६ किमंतीची किंगफिशर स्ट्रॉग बियर ३३० मि.ली मापाचे १८ नग, ४०,००० किमंतीची बजाज पल्सर असे एकुण ६९,१४६ रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी- कुणाल रतीलाल माळी याला अटक केली आहे.याबाबत फिर्यादी पो.ना.लक्ष्मण अरूण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार यातील सशंयित आरोपी कुणाल रतिलाल माळी वय-२५ रा.पिपरखेड याने वरील वर्णनाचे व किमंतीची बियर अवैधरित्या कुठल्याही पास परवाना नसतांना चोरटी विक्री करीत संचारबंदिच्या आदेशाचे उल्लघंन केले असल्याने सदर सशंयित आरोपी वर ६५(ई) १८८,२६९, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे ५१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ कैलास फकिरा गिते हे करीत आहे.
भडगांव तहसिलदासह महसुल व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई
भडगांव तहसिलदांर माधुरी आंधळे यांना नगरदेवळा स्टेशन येथील हॉटेल आनंद गार्डन येथे अवैध रित्या दारू विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली त्यानुसार नगरदेवळा स्टेशन येथील हॉटेल आनंद गार्डन येथे अवैध दारू विक्री होत असल्याने येथे सापळा रचुन तहसिलदार माधुरी आंधळे यांच्या सुचनेनुसार पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली परि.पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे,तलाठी राहुल पवार, एस.ए.मांडोळे, पो.ना.लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील,स्वप्नींल चव्हाण, नितिन सोनवणे, होमगार्ड भरत चव्हाण असे महसुल व पोलिस प्रशासनाने ही संयुक्त धडक कारवाई केली आहे.