धुळे(प्रतिनिधी)- सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे 17 मे पर्यंत लॉकडाउन जाहिर झालेले आहे. त्यामुळे गरीब व मजुरी करणऱ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंत्यत बिकट झालेली आहे. अशा गरजू कुटंबाची मदत करण्यासाठी कृती फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध गरजू कुटुंबाना जिवनावश्यक किराणा वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यामध्ये सलून दुकानदार, लॉन्ड्रीवाले, सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, वाहन चालक, मजुर यांचा समावेश होता. कृती फाऊंडेशनने लॉकडाउन सुरू असल्यापासून जळगाव,धुळे, अहमदनगर, कल्याण, पुणे, नासिक, ठाणे अशा विविध ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे. हा उपक्रम कृती फाऊडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन व कार्याध्यक्ष अमित माळी यांच्या मार्गदर्शनाने तर कृती फाऊंडेशन धुळे टिमचे सुरेश देवरे, स्मिता देवरे, संकेत देवरे व संकल्प देवरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
यामध्ये सलून दुकानदार, लॉन्ड्रीवाले, सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, वाहन चालक, मजुर यांचा समावेश होता. कृती फाऊंडेशनने लॉकडाउन सुरू असल्यापासून जळगाव, चालिसगाव, अहमदनगर, नासिक, मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे अशा विविध ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे.