उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असतानाच परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे कोरोणाचा रुग्ण सापडला असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. तो रुग्ण परंडा तालुक्यातील सरणवाडीतील रहिवासी असून तो ड्रायव्हर आहे तसेच वाशी ,मुंबई, माढा येथे खरबूज आणि टरबूज विकत होता. तसेच या रुग्णावर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासन नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी दिवस – रात्र कार्यरत आहे . आता नागरिकांना स्वतःहून काळजी घ्यावयाची गरज आहे. कोरोणाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला असून नागरिकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे.