नागरिकांनी फक्त ऑनलाईन अर्ज करावा
चंद्रपूर, दि. 11 : लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात व परिसरात अडकलेल्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनाच अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवास करण्यास परवानगी व ई-पास दिला जाणार आहे.
कशासाठी, कशी मिळणार परवानगी :
जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो http://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन विचारलेली आवश्यक माहिती भरावी. अर्ज भरताना अर्जासोबत स्वतःचा फोटो, ओळखपत्र व वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अथवा राज्यात जायचे असल्यास तेथील सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करणे आवश्यक आहे.
प्रवास करताना दुचाकी वाहनावर केवळ 1 व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर 2 व्यक्ती म्हणजेच एकूण 3 व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. मोठ्या वाहनांमध्ये प्रवास करीत असताना 50% एवढीच प्रवासीची मुदत राहणार आहे. ज्यांना खरोखरच आवश्यकता आहेत अशा व्यक्तींनीच अर्ज करावा अन्यथा करू नये. ही परवानगी ऑनलाईनच मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मात्र अन्यत्र जाण्यास परवानगी नाही.
खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक :
तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी, तालुका प्रशासनाशी संपर्क साधने सर्वात आवश्यक आहे.ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन आपल्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधणार आहे. संपर्क झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात त्या जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला प्रवास परवानगी विषयी कळविण्यात येईल. तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल.(त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात अडकला आहात, तेथील जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्याशी थेट संपर्क साधला तरी परवानगी देणे शक्य होणार नाही.) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तेथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्रमांक
07172-274166, 07172-274167, 07172-274168, 07172-274169, 07172-274170, 07172-274171, 07172-274172, 07172-274173, 07172-274174, 07172-274175 हे संपर्क क्रमांक 24 तास सेवा देणार आहे.