Saturday, July 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील ६३ रुग्णांची कोरोनावर मात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील ६३ रुग्णांची कोरोनावर मात

मालेगाव शहरातून सर्वाधिक ५१ रुग्ण कोरोनामुक्त!

नाशिक दि. ११ – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेसहाशेच्या पुढे गेला असला, तरी या संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. कोरोनाचा वेग कमी कसा करता येईल यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील ६३ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ६३  पैकी रेड झोन असलेल्या मालेगाव शहरातील सर्वाधिक म्हणजे ५१ रुग्णांना पूर्णणपणे बरे करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

Maha Info Corona Website

रविवारी, १० मे रोजी प्राप्त अहवालानुसार नाशिक ग्रामीणमधून २, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा ५१ असे एकूण ६३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, तब्बल ४ हजार ६०७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ५७४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. त्यात २ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच ५३३ अहवाल प्रलंबित असल्याचेही श्री. मांढरे म्हणाले.

मालेगावातूनही मिळतोय दिलासा

मालेगाव येथील ५३४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असे असले तरी याच मालेगावातील ५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.  महसूल, आरोग्य , पोलिस मनपा, जि प. सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ पणाला लाऊन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. संकटाची व्याप्ती मोठी असल्याने केवळ निरंतर प्रयत्न आणि संयम यावरच ही लढाई जिंकता येईल , असेही श्री.मांढरे यांनी सांगितले.

रुग्णांना बरे करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

कोरोनाबाधितांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता या रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची बाजी लावत असून, लवकरच जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा वाढलेला दिसेल, असेही श्री. मांढरे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधानसभा उपाध्यक्षांकडून स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजारांची मदत

Next Post

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीकपाशीची लागवड 1 जूननंतर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post
कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीकपाशीची लागवड 1 जूननंतर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo