जळगाव, दि. 12 (जिमाका) – युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रौणाचार्य पुरस्कार-2019 साठी नामांकने मागितले आहेत.
सदर पुरस्कांरासाठीची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव 3 जून, 2020 पर्यंत सादर करावेत.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज 26 मे, 2020 पर्यंत सादर करावयाचे असल्याने जिल्ह्यातील ईच्छूक अर्जदारांनी 19 मे, 2020 पर्यंत परीपूर्ण भरलेल्या प्रस्तावाची प्रत dsojal७०८०@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी. असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.