मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुलुंडमध्ये भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर त्यांची सोय व्हावी यासाठी मुलुंड पश्चिम येथील चेकनाक्या जवळील ऑक्ट्राय यार्डच्या इमारतीत १२५ बेडचे कोविड 19 उपचार केंद्र बनविण्यात आले असून आवश्यकता पडल्यास किंवा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास हे केंद्र कोरोना रुग्णांसाठी वापरण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे समजते.
या कोविड 19 उपचार केंद्रासाठी आवश्यक असलेल्या खाटा, बेड, स्वच्छतागृह, स्नानगृह तसेच इतर सुविधांची येथे सोय करण्यात आली असून वैद्यकीय उपकरणे देखील तातडीने बसविण्यात येणार आहे.
आज या केंद्राची पाहणी करण्यासाठी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, पालिकेचे उपायुक्त बलमवार, टी वार्डचे सहायक आयुक्त किशोर गांधी इत्यादी उपस्थित होते. या केंद्राची पाहणी करताना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन खासदार मनोज कोटक यांनी यावेळी केले.