मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
आपल्या भागातील बातम्या आपल्या मोबाइलला वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आमच्या व्हाट्स अप समूहात समाविष्ट व्हा https://chat.whatsapp.com/G58Hjtwf1SdH8BY51eIUZQ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे दोन वेळच्या जेवणाचे अतिशय हाल होत असल्याने शिवसेना विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर व महिला विभाग संघटिका संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र.१०७ च्या वतीने विभागात अन्नदानाचा उपक्रम शाखप्रमुख चंद्रकांत शेलार यांच्यातर्फे गेल्या महिन्याभरा पासून हाती घेण्यात आला आहे. दररोज साधारण ५०० गरजू कुटुंबियांना घरपोच अन्नाच्या पॅकेटचे वाटप शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार व सहकारी शिवसैनिक रमेश विरकर, उपशाखाप्रमुख सुनील पडवेकर, आनंद गवळी, सुदाम गुप्ता, अमित यादव, रूपेश वाघमारे, रमेश उतेकर, वसंत हार्णेकर, दत्ता कारडे, आलिम अन्सारी व इतर शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
गेल्या ४५ दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनच्या काळात रक्तदान शिबिर, धान्यवाटप, अन्नदान, विभागात सॅनिटायझर फवारणी, नागरिकांसाठी परिसरात भाजीपाला विक्री केंद्र इत्यादी अनेक सामाजिक कार्यात सहभागी होवून या कठीण काळात शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार हे नागरिकांना सतत मदत करत आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या सिद्धांताचे पालन करत लॉकडाऊन काळात शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार यांच्यामार्फत चालू असलेल्या या सामाजिक कार्याबद्दल विभागातील जनतेने समाधान व्यक्त केले असून शिवसेनेच्या या कार्याचे कौतुक केले आहे. लाभार्थ्यांनी देखील शाखाप्रमुख चंद्रकात शेलार यांच्या या सामाजिक कार्याची स्तुती करुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.