जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 190
जळगाव, दि. 12 (जिमाका) -जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 39 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा एक, जळगाव दोन तर भुसावळच्या चार रूग्णांचा समावेश आहे.
यामध्ये पाचोरा येथील 21 वर्षीय तरूणाचा, जळगाव शहरातील शांतीनगर येथील 51 वर्षीय व श्रीराम नगरातील 63 वर्षीय पुरूषाचा तर भुसावळ येथील 58, 60, 70 वर्षीय पुरूषांचा तर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तसेच अमळनेर येथील यापूर्वीच कोरोना बाधित आढळून आलेल्या एका 58 वर्षीय पुरूषाचा 14 दिवसानंतरचा तपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 190 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Yes