मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
शिवसेना मुलुंड विधानसभा आणि एमसीएचआय-बीजेएस यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग प्रमुख, आमदार रमेश कोरगांवकर, आमदार सुनील राऊत, महिला विभाग संघटिका संध्या वढावकर, माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वैद्यकीय शिबिर आज मुलुंड पश्चिम येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर, सेवाराम ललवाणी रोड येथे सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत आयोजिण्यात आले होते.
या वैद्यकीय शिबिरात सर्दी, ताप, खोकला, त्वचेचे आजार, अंगदुखी, इत्यादी आजारा संबंधित तपासणी करण्यात आली व औषधे देण्यात आली. लहान मुलांचे साथीचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व औषध देण्यात आले. थर्मल टेंपरेचर मशीन द्वारे नागरिकांची मोफत चाचणी सुद्धा करण्यात आली. साधारण २४१ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी उपविभागप्रमूख दिनेश जाधव, महिला उपविभाग संघटिका नंदिनी सावंत, मुलुंड विधानसभा संघटक नितीन सावंत, मुलुंड विधानसभा कार्यालयप्रमुख सीताराम खांडेकर, शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार, महिला शाखा संघटिका प्रमिला घाणेकर, युवासेना शाखाधिकारी संदेश मोढवे, भाविसे शाखा संघटक आकाश रोडे, प्रदीप ठोंबरे, अभिजित चव्हाण व इतर शिवसैनिक उपस्थित होते.