मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर अडकलेले परराज्यातील स्थलांतरित मजूर, कामगार यांना मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागातून त्या त्या विभागातील वार्ड ऑफीसर, सीडीओ, पोलिस अधिकारी सहकार्य करीत असून आज मुलुंडच्या टी विभागाच्या वतीने रेलवेच्या ठाणे स्थानकावरून सूटणाऱ्या विशेष रेल्वेने गुलबर्गा येथील आपल्या गावी परतणाऱ्या १२०० स्थलांतरितांना अन्न पाकीटे, मास्क, पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी रेल्वे अधिकारी, सहायक पोलिस अधिकारी वाळके, मनपा अधिकारी सीडीओ वेदिका पाटील, गणेश आंबोरे यांनी या विधायक उपक्रमात सहकार्य केले.