मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने रजनी केनी फाउंडेशन सुमती ग्रुप, मुलुंडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुलुंड पूर्व येथील जी. व्ही. स्कीम रोड महानगर पालिकेच्या शाळेत सकाळी १० ते ३ या वेळेत करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकुण ६३ बोटल्स रक्त जमा झाले.
नगरसेविका रजनी केनी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी के.ई. एम. रुग्णालय, परेल यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अमोल दहीफुले, विजय कुलकर्णी, नमित केनी व इतर अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.