मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
भांडूप विभागातील बहुतांश डॉक्टर गैरहजर असल्याकारणाने आजारी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन भारतीय जैन संघटना व क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ़ हाउसिंग यांच्या माध्यमातुन आणि भांडूपचे आमदार रमेश कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाने व शाखाप्रमुख राजेश कदम यांच्या प्रयत्नांने शिवसेना शाखा क्रमांक ११४ आणि बाळ गोपाळ मित्र मंडळ, शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि.१२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत मोबाइल दवाखाना आयोजित करण्यात आला होता. अनेक स्थानिक रहिवाश्यांनी ह्या फिरत्या दवाखान्याचा लाभ घेतला. यावेळी आजारी रुग्णांना मोफत औषधे देखील देण्यात येत होती.
यावेळी शाखा क्र ११४ चे शाखाप्रमुख राजेश कदम, महिला शाखा संघटिका भाग्यश्री गवस, तसेच बाळ गोपाळ मित्र मंडळाचे कार्यकर्ते सचिन उतेकर, बाळू लुळे, संजय घोसाळकर, सूरज चव्हाण, विकास गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.