<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगात महामारीचे सावट दिसू लागले असून ती थांबवण्यासाठी सरकारने जनतेला घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून शासनाकडून जनता संचारबंदी लागु करण्यात आली आहे.
ही परिस्थिती गेल्या दीड दोन महिन्यापासून असल्याने गरीब जनतेला ह्याचा सर्वात जास्त फटका बसला असून ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर भूकमारीची वेळ आली आहे. अशातच कृती फाऊंडेशनच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वीटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार, बांधकाम मजूर यांना जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
त्यांच्या ह्या कृत्यातून माणुसकी अजून मजबूत होताना दिसत आहे. सदर उपक्रम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुजित माळी, प्रा. डॉ. एस. डी. माळी, मनीष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून या उपक्रमाची संकल्पना शांताराम माळी, रंजना महाजन यांनी मांडली. प्रसंगी तुषार महाजन, संपदा माळी, संगीता माळी, धनंजय मोरे, हेमंत पाटील, सार्थक माळी, दिपक पाटील, स्पंदन माळी, शुभम पाटील, पप्पू देसले, गौरव महाजन आदी उपस्थित होते तर सत्यमेव जयते न्यूजचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, जिल्हा प्रतिनिधी चेतन निंबोळकर, एन न्यूज 24 चे फुलचंद पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.